Hot Posts

6/recent/ticker-posts

नाशिकमध्ये पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकार कृती समितीतर्फे जाहीर निषेध.


अकबर शेख (प्रतिनिधी) सोलापूर:-
नाशिकमध्ये पत्रकार बांधवांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने पत्रकार वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने गुंडांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, सरकारकडून पत्रकारांच्या सन्मानाची पायमल्ली सातत्याने होत असल्याचा आरोपही करण्यात आला.
दरम्यान, सोलापूर येथील चार हुतात्मा पुतळा येथे पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्था व पत्रकार बांधवांच्या वतीने काळ्या फिती लावून जाहीर निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला.
या घटनेचा जाहीर निषेध करताना पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्थेचे आप्पाश्री लंगोटे, सामाजिक कार्यकर्ते नाना प्रक्षाळे व ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी प्रतिक्रिया दिली. "पत्रकारांवरील हल्ले हे लोकशाहीला धोका आहे, अशा घटना निंदनीय असून सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी," अशी मागणी त्यांनी केली.निषेध सभेला सैफन शेख, लतीफ नदाफ, नितीन करजोळे, गिरमल गुरव, अस्लम नदाफ, ज्येष्ठ पत्रकार

Post a Comment

0 Comments