पुणे प्रतिनिधी (नारायण अलदार) :- पुणे शहरात पुन्हा एकदा टोळीयुध्दाचा संघर्ष सुरू झाला असून पूर्व वैमनस्यातून एका आरोपीचा गोळ्या घालून खून करण्यात आला आहे.
पुणे मनपाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हयांच्या हत्येचा आरोपी समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याची खडी मशीन परिसरात गोळ्या झाडून निघृण हत्या करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार गणेश काळे हा दोन दिवसांपूर्वीच अवैध कारवाईच्या प्रकरणात अटकेतून जामिनावर सुटलेला आरोपी होता. तो आपल्या रिक्षामध्ये बसून डी. जे. पेट्रोल पंपाजवळ आला असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी गणेश काळेवर अंधाधुंद गोळीबार केला. त्यावेळी प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार हल्लेखोरांनी त्यांच्या बंदुकीतून अनेक गोळ्या गणेश काळेवर झाडल्या. त्यावेळी परिसरात एकच गोंधळ उडाला आणि हया घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हल्ल्यानंतर अनेक आरोपी आपली गाडी घटनास्थळी सोडून पसार झाले. घटनेची माहिती पुणे शहर पोलिसांनी मिळताच पुणे पोलीसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांनी घटनेतील दोषी आरोपींवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत.
सदर घटनेची माहिती घेऊन गुन्हे शाखेचे विशेष पथक आरोपींचा तपास करत आहे. सदर हत्येमागील संबंधित आरोपींची गुन्हेगारीची पार्श्वभूमी शोधून पुणे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
0 Comments