Hot Posts

6/recent/ticker-posts

पाणी अपव्ययावर महापालिकेची कडक कारवाई; दंड आणि जोडणी बंद करण्याचा इशारा

    जगदीश कोरे (प्रतिनिधी).सोलापूर, :-
सोलापूर महानगरपालिका ने शहरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. नळ उघडे ठेवणे, रस्ते व वाहने पाईपने धुणे, गळती दुरुस्त न करणे किंवा अवैध जोडण्या घेणे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
महापालिकेच्या जलविभागाकडून विशेष पथके तयार करण्यात आली असून ती विविध भागांत तपासणी करणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आकारणे, वारंवार उल्लंघन झाल्यास पाणी जोडणी तात्पुरती बंद करणे, तसेच अवैध कनेक्शन तोडणे अशी कारवाई केली जाईल. मीटर असलेल्या ग्राहकांकडून जादा वापरावर वाढीव दर आकारण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, “शहरात सुमारे 30 टक्के पाणी वितरण प्रक्रियेत वाया जाते. त्यात नागरिकांनी अनावश्यक वापर टाळल्यास टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.” प्रशासनाने नागरिकांना घरगुती गळती त्वरित दुरुस्त करण्याचे आणि पाणी बचतीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे.
टंचाईच्या काळात नियमभंग केल्यास अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
      सोलापूर महापौर यांनी दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी उपाय योजनेसाठी बैठक घेतली पण या बैठकीत वरील मुद्दा वर चर्चाच झाली नाही.
    शहरांमधे पाणी यायच्या दिवशी पाण्याचा कसा वापर करतात व पाणी कसे वाया घालवतात जसे गाड्या धुणे घरासमोरील कट्टे , जिना धुणे इतर प्रकारे पाणी रस्त्यावर वहात असतं अन् झोपडपट्टी भागात तर टोपल्यात पाईप सोडायच अन् धुणीभांडी करायचं
 असं किती पाणी वाया जाते त्याच मोजमाप नाही. 
     40टक्के पाणी हे वाया जाते.

Post a Comment

0 Comments