Hot Posts

6/recent/ticker-posts

स्विमिंग पुलमध्ये पोहायला गेलेल्या अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू



पुणे प्रतिनिधी :  पुण्यातील चंदन नगर भागात संघर्ष चौकामधील खालसा जिम याठिकाणी असलेल्या स्विमिंग पुलमध्ये मित्रासह पोहायला गेलेल्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाला स्विमिंग पुलच्या सुरक्षेच्या बेजबाबदारपणामुळे स्वतःचा जीव गमवावा लागल्याची दुर्घटना 16 एप्रिल 2024 रोजी दुपारी 2.30 ते 3.30 च्या दरम्यान घडून आली आहे. याप्रकरणी चंदन नगर पोलिसांनी 13 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असणारया एका खाजगी सुरक्षा रक्षकाविरोधात व चालकाविरोधात भा.दं.वि.क. 304(अ), 336, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

फिर्यादी नदिम तांबोळी यांचा 13 वर्षीय अल्पवयीन मुलगा अतिक नदिम तांबोळी हा अचानक अशा दुर्घटनेचा बळी गेल्याकारणाने त्यांना असहाय्य वेदना झाल्या आहेत. या दुर्घटनेमुळे वडगांवशेरी परिसरात शोककळा पसरली आहे. मुस्लिम बांधवांनी व स्थानिक नागरिकांनी अतिकाच्या मृत्यूविषयी हळहळ व्यक्त केली आहे.  दाखल गुन्ह्यातील आरोपी सुरक्षा रक्षक देवानंद रायबोले आणि चालक परलोकसिंग अजितसिंग दिवाना या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पुढिल कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. 

13 वर्षीय अतिक नदिम तांबोळी आपल्या मित्रासह 16 एप्रिल रोजी सोमवारी दुपारच्या दरम्यान नेहमीप्रमाणे स्विमिंग पुलमध्ये पोहायला गेलेला असताना पोहताना त्याला अचानकपणे दम लागल्याने बचावासाठी ओरड करूनही कोणतीही सुरक्षा त्याला वेळेवर पाण्यातून बाहेर काढण्यासाठी तत्काळ उपलब्ध झाली नाही.  खालसा जिममधील स्विमिंग पुलमध्ये कोणत्या प्रकारे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात न आल्यामुळे व स्विमिंग धारकाची कोणत्याही प्रकारे काळजी न घेतल्यामुळे एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाला अशाप्रकारे जीव गमवावा लागल्याची दुर्घटना घडून आली आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक देत आहेत. याप्रकरणात जबाबदार असणारया दोषी आरोपींना पकडून ताब्यात घेण्यात येईल व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया चंदन नगर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांनी दिली आहे. गुन्ह्याचा पुढिल अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक घोडके करीत आहेत.

Post a Comment

0 Comments