Hot Posts

6/recent/ticker-posts

ऑनलाईन क्रिकेट सट्टा घेणारया 10 सट्टेबाजांना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात



पुणे प्रतिनिधी : पुण्यातील कोथरूडमधील भुसारी काॅलनीच्या टेरेस प्लॅटमध्ये क्रिकेट सट्टा घेणारया 10 सट्टेबाजांना पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले आहे. 10 संशयित आरोपींवर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक 1 चे ए.एस.आय. प्रविण ढमाळ व पोलीस हवालदार अमोल आवाड हे कोथरूड भागात पेट्रोलिंग करत असताना कोथरूडच्या भुसारी काॅलनीत ऑनलाईन क्रिकेटचा सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने भुसारी काॅलनीतील टेरेस प्लॅट क्रमांक 5 मध्ये छापा टाकला असता 10 सट्टेबाजांचा ऑनलाईन क्रिकेट सट्टा सुरू असल्याचे पुणे पोलीसांना आढळून आले. 10 आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

ऑनलाईन क्रिकेट सट्टा घेत असलेल्या 10 आरोपीची नावे 1) मुकेशकुमार शैलेंद्रप्रसाद शाहू, वय 24 वर्षे, 2) देवेंद्र कमलेशकुमार यादव, वय 21 वर्षे, 3) जसवंत भुषणलाल शाहू, वय 22 वर्षे, 4) राहुलकुमार गणेश यादव, वय 30 वर्षे, 5) रोहितकुमार गणेश यादव, वय 26 वर्षे, 6) दुष्यंत कोमलसिंह सोनकर,  वय 23 वर्षे, 7) संदिप राजु मेश्राम, वय 21 वर्षे, 8) आखिलेश्वर कृपाराम ठाकूर, वय 24 वर्षे, 9) मोहम्मद ममनुन ईस्माईल सौदागर, वय 32 वर्षे,  सर्व राहणार भिलाई, छतिसगड, 10) अमित कैलास शेंडगे, वय 32 वर्षे, रा. कोथरूड, पुणे असून या 10 आरोपी ऑनलाईन सट्टा घेत असताना आढळल्याने पुणे शहर खंडणी विरोधी पथकाने त्यांच्याकडून 16 मोबाईल, 2 लॅपटाॅप असा 2 लाख 20 हजार पाचशे रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कारवाई क्राईम ब्रॅचचे अॅडिशनल सी.पी. शैलेश बलकवडे, क्राईम ब्रॅचचे डी.सी.पी. अमोल झेंडे, क्राईम ब्रॅच 1चे ए.सी.पी. सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक 1चे सिनियर पी.आय. क्रांतीकुमार पाटील यांचे सुचनेप्रमाणे ए.पी.आय. अभिजित पाटील, पी.एस.आय. यशवंत ओंबासे, ए.एस.आय. प्रविण ढमाळ, अमोल आवाड, मधुकर तुपसौंदर, संजय भापकर, सयाजी चव्हाण, नितिन कांबळे, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, संभाजी गंगावणे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments