सोलापूर | प्रतिनिधी -मतदार बंधू भगिनींनो, भारत देशातील लोकसभेची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मी आपणा सर्वांना विनंतीपुर्वक आवाहन करतो की, या लोकशाही उत्सवात भारतातील सर्वच नागरीकांनी आपल्याला जो मताचा अधिकार भारतीय घटनेने दिलेला आहे, ही आपल्याला मिळालेली जी शक्ति आहे तीचा आपण 100% उपयोग केला पाहिजे आपण सर्वांनी 100% मतदान करणे आवश्यक आहे. तर हे शक्य आहे. आपण सर्वांनी निवडणुकीच्या पुर्वी आपले नाव व आपल्या परिवाराचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे खात्री करुन घेणे गरजेचे आहे म्हणून आपल्या मतदार संघातील निवडणुक कार्यालयात जाऊन आपले नाव निवडणुक यादीत आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी. आणी हेच काम आपल्या परिवार मित्र मैत्रीणींना आणि नातेवाईकांना सांगा. आणि आपले नांव यादीत आहे की नाही याची खात्री करा किंवा नाव यादीत नसल्यास ते येण्यासाठी त्याची प्रोसेस करा ही नम्र विनंती आहे. गाफिल राहु नका 2024 च्या निवडणुकीचा आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की, ही निवडणुक जातीयवादी, भ्रष्ट, हुकुमशाही मोदी सरकार विरुध्द लोकशाही अशी होणार आहे आपण सर्व जनता जाणता आहात की हे मोदी सरकार आता आपणांस नकोसे झाले आहे याची कारणे आणि काही ठळक घटना आपण सर्वजण जाणता आहात व आपण त्याचे बळी ठरलेलो आहोत, आपणा सर्वांचा दररोजचा प्रश्न आपणांस माहित आहे त्याचा अनुभव आहे. आज लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे 303 खासदार असतांना 65 रुपयांचे पेट्रोल 100 रुपये लिटर असे झाले आहे. जर भारतीय जनता पक्षाचे खासदार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 400 निवडुन आल्यावर 100 लिटरचे पेट्रोल किती होईल ? सुमारे 150/- रुपये इतके होईल असे वाटते. तरीदेखील हे निर्लज्ज लोक पुन्हा आम्हालाच निवडुन द्या असे आवाहन मतदारांना करतात. म्हणून हे नको आहे. देशामध्ये नोटाबंदी आणि जीएसटी च्या चुकिच्या अंमलबजावणीमुळे 12 कोटी लोकांच्या नोक-या गेल्या. त्याचबरोबर आज करोडो लोक दारीद्रयरेषेखाली जीवन जगत आहेत याला मोदी सरकार जबाबदार नाही का ? याचा विचार आपण केला पाहिजे.आज मंदिर, मश्जिद नव्हे, शाश्वत रोजगार हवा, अशी आपली मागणी आहे. पण याकडे जाणीवपुर्वक मोदी सरकार दुर्लक्ष करुन राममंदिराची उभारणी करुन लोकांना धार्मिक श्रध्देखाली गुंतवुन ठेऊन मतदारांची दिशाभुल करुन मताची मागणी करीत आहेत. याचा ही आपण विचार केला पाहिजे. प्रत्येकाची धार्मिक श्रध्दा आहे. याचा आपण आदर केला पाहिजे. पण केवळ मतदानासाठी धार्मिक भावनेचा वापर करणे, संविधान व लोकशाही विरोधी आहे. या देशाचा अन्नदाता शेतकरी यांचे शेतमालाला उत्पादन खर्च आधारीत बाजारभाव दिला पाहिजे. याकडे आतापर्यंत कोणत्याही सरकारने लक्ष दिले नाही त्यांच्या विरुध्द केंद्र सरकारने 3 जाचक कृषिकायदे केले ते रद्द व्हावे म्हणून शेतकरीयांनी दिल्ली सिमेवर सन 2020 ते सन 2021 दरम्यान वर्षभर आंदोलन केले. मोदी सरकारने ते आंदोलन चिरडुन टाकण्याचा प्रयत्न केला. गोळीबार केला यामध्ये शेकडो शेतकरी मृत्यमुखी पडले. याला जबाबदार मोदी सरकारच आहे. म्हणून हे समुद्रात बुडविले पाहिजे. अशी आमची मागणी आहे मतदार मित्रांनो, आपण सन 2014-2019 च्या निवडणुकीत भाजपाला मतदान केले आहे. त्यांनी तुम्हाला काय दिले? याचे उत्तर अजुन मिळाले नाही या देशात मोठया प्रमाणात बेरोजगारी वाढली. महागाईने कळस गाठला देशात धार्मिक हिसाचार वाढला. धार्मिक दंगली वाढल्या देशातील परकिय कर्ज वाढले. देशात महिलांवर होणारे अत्याचार वाढले, बलात्कार वाढले, देशात शेतकरी आत्महत्या वाढल्या, नोटबंदी, पुलवामा, शेतकरी आंदोलन यात लाखो भारतीय मृत्यमुखी पडले. कोरोना यात लाखो भारतीय मारले गेले. दहशतवाद, भ्रष्टाचार, कामगार अत्याचार अशा हजारो घटना घडल्या. याला कोण जबाबदार ? मोदी सरकार. भारत-चिन सिमा प्रश्न आजुन आहे तसाच आहे. उलट चिनने 400 किमी आपल्या देशात घुसखोरी करुन बांधकाम केलेले आहे. याकडे मोदी सरकार का लक्ष देत नाही? त्यांना चिनची भिती वाटते काय ? लोकशाही धाब्यावर बसवुन पक्ष फोडा आणि राज्य करा, ई डी, सी बी आय, न्यायव्यवस्था, निवडणुक आयोग सर्व यंत्रणांचा वाटेल तसा वापर करुन आज भाजपा लगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. म्हणून लोक या पक्षाला वॉशिंग मशिन म्हणतात. हे खोटे आहे काय ? देशाची 90% सार्वजनिक व्यवस्था आडाणी या व्यक्तिला विकुन त्याला जगातील दुसरा श्रीमंत व्यक्ती करण्यात आले आहे. आणि हाच देशाच्या राज्यकारभाराची मोदी सरकारची सुत्रे हलवित आहे. हाच खरा सुत्रधार आहे. म्हणजे आपली सत्ता एका भानगडदार व्यक्तिच्या हातात गेली आहे. त्यामुळे आपले शोषण वाढले आहे. मतदारांनो तुम्ही मोदी सरकारला निवडुन देऊन काय मिळवले ? हा खरा प्रश्न आहे. बेरोजगारी, महागाई, बेईमानी, गददारी, भ्रष्टाचार, देशद्रोह, राष्ट्रद्रोह, महिलांवर होणारे बलात्कार, आतंकवाद, यामध्ये वाढ झालेली आहे. या साठी पुन्हा मोदी सरकारला निवडुन द्यायचे काय ? असे सरकार समुद्रात बुडवुन टाकले पाहिजे. अशी दलित पँथरची व आपली मागणी असली पाहिजे. म्हणून आता आपल्याला ही संधी मिळालेली आहे. आपले मौल्यवान मतदान करुन मोदी सरकार फेकुन दिले पाहिजे.ब्रिटीश काळात सुध्दा अशाप्रकारची अन्याय, अत्याचाराची झळ पोहोचली नाही. या काळात तुमच्या आमच्या आई बहिणी ब्रिटीश सेवेत होत्या. आज त्याच्या ब्रिटीश सरकारच्या नाजायज औलादी भाजपा, आर एस एस म्हणून मिरवत आहेत. यांनीच भारतीय स्वातंत्र्य लढयात भाग घेतला नाही भारतीय स्वातंत्र्य मिळण्यास या लोकांनी विरोध केला. याची चिड आपल्याला असली पाहिजे. पण आज ते आपल्या डोक्यावर सरकार म्हणून बसले आहेत. त्यांना फेकुन द्या. या सरकारला महामानव शाहु, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा मानवतावाद पुरोगामीत्व मान्य नाही. त्यांना महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, यांचा त्याग मान्य नाही. यांना हे लोक देशद्रोही ठरवत असतात. 2014 2019 आपण भाजपाला मतदान केले त्यामुळे ते सत्तेवर - आले. त्यामुळे आपणच खरे मोदीच्या नावावर मतदान केले असेल तर आपणच खरे देशद्रोही आहोत. असे समजायला हरकत नाही. हेच लोक भारतीय देशाची घटना बदलणार आहेत. पुन्हा मनुस्मृती तुमच्यावर राज्य करणार आहे. तुम्हाला हेच लोक गुलाम बनविणार आहेत. हेच लोक सर्व सत्ताधिश होणार आहेत याची गंभीर दखल घेतली पाहिजे. 2014 च्या निवडणुकीत लोकसभेत भाजपाला मिळालेली मते 34.56 एवढे होते. 2019 ला हेच 39.13 होते. हे मतदान केवळ ब्रिटीश आताचा भाजपा आर एस एस च्या नाजायज औलादीच होत. यांचे हे मतदान आहे. यामध्ये आपण बहुजनांनी मतदान केलेले नाही. ईव्हीएम व्दारे फसवणुक करुन भाजपा सरकार सत्तेवर आलेले आहे. अजुनही अशाच प्रकारे ते सत्तेवर येऊ पाहात आहे. याला विरोध केला पाहिजे. व मतदान पत्रिकेवर मतदान झाले पाहिजे याचा आग्रह धरला पाहिजे. तरच हे जुलमी भाजपा सरकार सत्तेवरुन जाणार आहे. पण हे होऊ देत नाहीत. आता मोदी आणि भाजपा आर एस एस ला मातीत गाडण्याची वेळ आली आहे. पुन्हा पुन्हा विचार करा.मंदिर मश्जिदच्या लढाईत भारत देश 100 वर्षे मागे गेला आहे. भाजपा पुन्हा सत्तेत आली तर दलितांच्या कमरेला झाडु व हातात मडके येणार आहे. अच्छे दिन केवळ भाजपा, आर एस एस यांनाच लाभणार आहेत. आपण केवळ गुलाम राहणार आहोत. म्हणून भाजपा हटाव देश बचाओ. संविधान लोकशाही बचाव. यासाठी ही आपली शेवटची संधी व लढाई आहे. यासाठी आपण एकच काम करणे संयुक्तिक वाटते. आणि ते म्हणजे भाजपा आणि भाजपाचे मित्र पक्ष यांच्या विरोधात जे जे उमेदवार लढत देणार आहेत त्या उमेदवारातुन जो उमेदवार दुस-या क्रमांकाचे मत घेणार आहे त्या उमेदवाराला आपण मतदान केले पाहिजे आपले मत विभाजन होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे आजपर्यंत भाजपा असो कि काँग्रेस असो कि राष्ट्रवादी असो कि शिवसेना असो कोणताच पक्ष आपल्यासाठी उपयोगी नाही. पण मुख्य उद्देश भाजपा आणि मित्र पक्ष यांचा पराभव हेच आपले मिशन आहे हुकुमशाही आणि धर्मसत्ता प्रस्थापित होऊ नये. पुनश्च मनुस्मृती ची सत्ता प्रस्थापित होऊ नये याचा आपल्याला विचार करावा लगेल. संविधान लागु झालेपासुन आपल्याला हक्क अधिकार प्राप्त झाले. आपल्याला अधिकार मिळाले आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले यामध्ये आपले कल्याण झाले. यासाठी पुन्हा आपण दक्ष राहिले पाहिजे. म्हणून भाजपा विरोधात जे जे उमेदवार लढत देणार आहेत त्या उमेदवारातुन दुस-या क्रमांकाचे मत घेणारा त्या उमेदरवालाच आपण मत दिले पाहिजे. असे केल्याने मत विभाजन होणार नाही. आणि निश्चितच आपण भाजपाला हरवु शकु नाही हरवु शकलो तर किमान राक्षसी बहुमत तरी मिळणार नाही याची खबरदारी घेऊ किमान विरोधी बाकावर बसणारा सक्षम विरोधक तरी तयार होईल आणि मोदी सरकारचा माज कमी होईल. आपण मतदार राजे आहोत. निश्चितच असे झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आहे म्हणून आपण आपल्या वॉर्डामध्ये गल्यामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये, मित्रामध्ये, नातेवाईकांमध्ये असा प्रचार केला पाहिजे
0 Comments