Hot Posts

6/recent/ticker-posts

नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा इथे लावणी सम्राज्ञी लोदगेकर देत आहेत धडे

 

सोलापूर ::आपल्या दिलखेचक अदानी ख्याती प्राप्त लावणी सम्राज्ञी प्रमिला लोदगेकर  देशातील सर्वोच्च  मानल्या जाणाऱ्या  राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा (दिल्ली) इथे लावणीचे धडे देत असून लावणी प्रशिक्षण देण्याचा हा बहुमान त्यांना मिळाला आहे तमाशा प्रशिक्षण शिबिराअंतर्गत येणाऱ्या लावणी नृत्य प्रकाराचे प्रशिक्षण त्या देत असून 40 विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्याकडून लावणीचे धडे घेत आहेत 4 मे रोजी हे कलाकार आपली कला रंग मंचावर सादर करतील घुंगरू बांधण्यापासून ते  पोशाखाच्या मूळ पद्धती, लावणी गायन, मूळ तमाशातील नृत्य प्रकार,ढोलकी, तुणतुणे मंजिरा आदी वाद्यांच्या प्रशिक्षणाबरोबरच गणगवळण,बतावणी, लावणी याचाही या प्रशिक्षणात समावेश आहे 

 राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (दिल्ली )इथं तमाशा शिकवला जातो आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त लोककला संशोधक तथा मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीचे  प्रमुख डॉक्टर गणेश चंदनशिवे हे ही जबाबदारी पार पडत आहेत यातील तमाशा प्रशिक्षण शिबिरांतर्गत येणाऱ्या लावणी नृत्य प्रकारचं  प्रशिक्षण  नंदा प्रमिला संगीता लोदगेकर पार्टीच्या प्रमिला लोदगेकर या देत आहेत लावण्यवती ते लावणी सम्राज्ञी  अशी त्यांची वाटचाल असून अकलूज लावणी स्पर्धेत सलग तीन वेळा त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलाय शिवाय विविध पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहेत दरम्यान भारत सरकारच्या वतीने चीन दुबई इथे महाराष्ट्राची लोककला कार्यक्रमात लावणी सादर करण्याची संधी देखील प्रमिला लोदगेकर यांना मिळाली आहे तर नाट्यसंगीत अकॅडमी चा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा रत्न पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे 

आज पारंपरिक तमाशाला कधी दुष्काळाचा सामना करावा लागतो तर कधी पावसाच्या सावटाचा ,कधी यात्रा जत्रातील परवानगीचा तर कधी आचार संहितेचा .अशा प्रतिकूल परिस्थितीतही तमाशा टिकून आहे आपले पारंपरिक अस्तित्व घेऊन. अशा प्रतिकूल परिस्थित भारतातील इतर लोककलावंत आपल्या राज्यातील लोककला इतर राज्यात पोहचवण्यासाठी धडपडत आहेत. जसा गुजरातचा भवाई ,उत्तर प्रदेशची नौटंकी ,ओरिसाचा छाऊ ,प. बंगालचा बाऊल ,छत्तीसगडची पांडवणी तशीच  महाराष्ट्राची अस्सल रांगडी लोककला तमाशा .आता महिनाभर या भारतभरातील मुलांना तमाशाचा इतिहास ,त्याची जडण घडण ,त्यातील कलावंतांचे योगदान ,त्यातील घटक ,तमाशाचे पूर्ववैभव ,आजच्या काळातील तमाशाची अवस्था  आणि त्याचे सादरीकरण याचे प्रशिक्षण डॉ. गणेश चंदनशिवे अमराठी मुलांना देणार आहेत. सोबत हार्मोनियम साठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ हार्मोनियम वादक श्री सुभाष खरोटे, ढोलकी साठी उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार प्राप्त श्री विकास कोकाटे आणि नृत्य दिग्दर्शनासाठी डॉ. सुखदा खैरे आणि उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार 2023 प्राप्त लावणी सम्राज्ञी प्रमिला लोदगेकर असणार आहेत.
तमाशा प्रशिक्षण शिबिरात
महाराष्ट्रातील तमाशाचे पारंपारिक स्वरुप जोपासण्यासाठी नव्या पिढीतील तरुण कलाकारांना तमाशाच्या पारंपारिक स्वरुपाबाबत मार्गदर्शन तसेच
कलाकारांना पोशाखाच्या मूळ पध्दती, लावणी, गायन, मूळ तमाशातील नृत्य प्रकार  ढोलकी, तुणतुणे, मंजिरा इ. विशिष्ट वाद्ये यासंबंधीचे प्रशिक्षण राष्ट्रीय नाटय विद्यालय, दिल्ली येथे आयोजित तमाशा प्रशिक्षण शिबिरात देण्यात  येईल अशी माहिती आंतरराष्ट्रीय  ख्यातीप्राप्त लोककला प्रशिक्षक , नामवंत  सिने पार्श्वगायक  तथा मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीचे प्रमुख, डॉ. गणेश चंदनशिवे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments