अकबर शेख (प्रतिनिधि) विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूरची जागा ही कांग्रेस पक्षालाच मिळणार आणि ते डॉ.धवलसिंह मोहिते पाटील हेच लढणार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. दक्षिण सोलापूर हे विधानसभा मतदारसंघ एकेकाळी महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे आणि जिल्ह्यातील सर्वाधिक कांग्रेस कार्यकर्ते असणारा मतदारसंघ आहे. यामुळे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे ही जागा कांग्रेस पक्षाकडेच रहावे यासाठी प्रयत्न करत आहेत. डॉ.धवलसिंह मोहिते पाटील व धर्मराज काडादी यांचे नावे दक्षिणसाठी अग्रेसर आहेत.पण जिल्हा अध्यक्ष डॉ.मोहिते पाटील यांनी काडादींची भेट घेतल्यामुळे धवलसिंह दक्षिणची जागा मिळवण्यात यशस्वी होतील अशी चर्चा आहे. गुरुवारी झालेल्या जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत दक्षिण सोलापूरमधील कार्यकर्तेंनी उघडपणे नाराजी दाखवत पक्षश्रेष्ठीं कार्यकर्तेंच्या भावनांचा विचार करून हा मतदारसंघ कांग्रेसलाच सोडावे यासाठी जिल्हा अध्यक्ष मोहिते पाटील यांच्याकडे मागणी केली. यावेळी आपण २९ तारखेपर्यंत वाट पहा असे सांगण्यात आले.ही जागा कांग्रेसला मिळाली नाही की सांगली पॅटर्न होणार असल्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात होत आहे.
0 Comments