प्रतिनिधी (सोलापूर) : दक्षिण विधानसभेसाठी अपक्ष म्हणून फुलेवाद सप्ताहिक व फुलेवाद न्युज २४ चे संपादक म्हणून गेल्या १२ वर्षापासुन तळागळातील गोरगरिब, सुशिक्षित, बेरोजगार यांना जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून स्वयं रोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले आणि महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ मिळवून दिला. अनेक शासकीय योजनांचा लाभ जनतेला मिळवून दिला. महिलांसाठी स्वयंरोजगार देण्याचा प्रयत्न केला जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसिल कार्यलय, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यलय मधील सर्व सामान्य जनतेचे कामे करुन दिले असे अशोक ढोणे यांनी सांगितले.
दक्षिण सोलापूर तालुक्यात वैद्यकीय, आणणार असून मोठे उद्योगही तालुक्यात आणणार आहे. तालुक्यातील युवकांना इथेच रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे. गेली पंधरा वर्ष सीना-भीमा संघर्ष समितीच्या माध्यमातून पिणीप्रश्न कायमस्वरुपी सोडवणार असून तालुक्यात बॅरेज बंधोर, चेक डॅम व शेत तळ्यच्या माध्यमातून शेतर्कयांना पाणी उपलब्ध करुन देणार आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करुन त्यांना पेरणीपूर्व मशागतीसाठी एकरी २५००० हजार रुपये देणार, शेतीमालाला किफायतशिर भाव देणर, जो मागेल त्याला वेअर हाऊस, गोशाळा, कुकुटपालन इत्यादी व्यवसाय देऊन शेतकऱ्यांना सक्षम करणार आणि ऊस उत्पादक शेतकांना रिकव्हारी प्रमाणे कारखानदार कडुन भाव मिळवुन देणार.
मंद्रुप एम.आय.डी.सी. चा प्रकल्प तडीस नेणार असून तालुक्यात कृषीप्रक्रीया उद्योग उभारुन सहकाराच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. फुलेवाद सप्ताहिक व फुलेवाद न्युज २४ चे संपादक या नात्याने ओ.बी.सी. समाज, धनगर समाजाच्या आणि अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून समाजकार्यात सहभागी असतो. आणि शासन-प्रशासन क्षेत्रातील कामाचा दीर्घ अनुभव मला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी शासनाचा महसुल बुढतो त्या ठिकाणी लक्ष घालुन शासनाला महसुल मिळवुन देलेला आहे. शिक्षण क्षेत्र आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे अशोक ढोणे यांनी सांगितले.
0 Comments