सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आमदार विजय देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरूवात प्रबुद्ध भारत चौक,येथुन झाली. या पदयात्रेच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेऊन या पदयात्रेत सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष संतोष पवार, माजी नगरसेवक गणेश पुजारी, अमर पुदाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे, माजी नगरसेविका स्वाती आवळे, नगरसेविका वंदना गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते भारत बापरे, उद्योजक इद्रमल जैन, गौतम संचेती, पुरुषोत्तम धूत, अनिल छाजेड,पी.बी .ग्रुप प्रमुख गौतम चंदनशिवे, लालू खंडेलवाल, अजित गायकवाड ,समाधान आवळे, दशरथ कसबे , सामाजिक कार्यकर्ते पिंटू डावरे,गौतम कसबे, श्रीमंत जाधव ,चंद्रकांत सोनवणे, धम्मपाल मंदर्गीकर, अविनाश भडकुंबे , गोपीनाथ जाधव,उमेश रणदिवे, पी बी ग्रुप अध्यक्ष आदित्य चंदनशिवे, धनराज तळभंडारे, सिद्धार्थ सुर्वे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
0 Comments