Hot Posts

6/recent/ticker-posts

विधानसभा झाली! आता लवकरच महापालिका निवडणुका?

 (जगदीश कोरे प्रतिनिधी)राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर यात महायुतीला मोठे यश मिळाले आता गेल्या अनेक काळापासून रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. बहुतांश ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत, आता या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. महायुतीने महाविकास आघाडीला भुईसपाट करत दिमाखदार विजय प्राप्त केला आहे. राज्यातील जनतेने महायुतीच्या पारड्यात भरघोस यश दिले आहे. दरम्यान मुंबई महापालिका असो की सोलापूर महापालिका किंवा राज्यातील अशा बहुतांश महापालिका-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. सोलापूरसह इतर ठिकाणी तर साडेचार ते पाच वर्ष उलटून गेली पण निवडणुका झाल्या नाहीत. येथील लोकांना निवडणुका कधी होतील, याची प्रतिक्षा आहे. महत्वाची बाब म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकांमार्फत काम केले जात आहे

महाविकास आघाडीचे नेते वारंवार निवडणुका जाहीर करा, असे म्हणत होते व महायुतीवर आरोपही करत होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास प्रतिकूल असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे राज्यात लवकरच राज्यात लवकरच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहतील अर्थात निवडणुका जाहीर होतील अशी शक्यता आहे. विधानसभेच्या एतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत सकारात्मक भूमिका आहे"

Post a Comment

0 Comments