Jagdish Kore पत्रकार: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भाजपची आश्चर्यकारक कामगिरी समोर आली आहे. महायुतीने दणदणीत विजय मिळवल्याचे चित्र आहे. म्हणजेच राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. राज्यात भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप आणि महायुतीचे उमेदवार अतुल सावे विजयी झाले आहेत. त्यांनी अटीतटीच्या लढतीत एमआयएमचे उमेदवार आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांचा पराभव केला आहे. शेवटच्या फेरीत लागलेल्या निकालात अखेर सावे यांनी बाजी मारली आहे.
0 Comments