Jagdish Kore पत्रकार: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भाजपची आश्चर्यकारक कामगिरी समोर आली आहे. महायुतीने दणदणीत विजय मिळवल्याचे चित्र आहे. म्हणजेच राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. राज्यात भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले, आजच्या निकालाने स्पष्ट केले की, संपूर्ण महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र यांच्या पाठीशी आहेत. राज्यातील सगळ्या समाजाच्या लोकांनी एकत्र येवून मतदान केले. लाडक्या बहिणींचे देखील फडणवीस यांनी मानले आहेत. महाविकास आघाडीने मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. महायुतीच्या लाखो कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, रामदास आठवले आणि आमच्या एकजुटीचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.
लोकशाहीमध्ये कोणाला जनता डोक्यावर घेईन, कोणाला धाराशाही करेल ते सांगता येणार नाही. मुख्यंमत्रिपदाबाबत हे कोणत्याही निकषावर नाही. त्याबाबत तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहेत. कोणताही वाद नाही, कोणताच विवाद नाही. जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य असेल. एक प्रकारे लोकांनी निर्णय दिला आहे, शिंदे यांना खऱ्या शिवसेनेच्या रूपात आणि अजित पवार यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रूपात स्विकारले असल्याचे फडणवीस म्हणाले.
0 Comments