Hot Posts

6/recent/ticker-posts

आम आदमी पक्षावर आरोप करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना 24 तासात दूर करा अन्यथा काँग्रेसलाच इंडी आघाडीतून बाहेर काढू, असा इशारा आम आदमी पक्षाच्या दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी दिला आहे.

Jagdish Kore पत्रकार: नवी दिल्ली: प्रतिनिधी 
आम आदमी पक्षावर आरोप करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना 24 तासात दूर करा अन्यथा इतर घटक पक्षांशी चर्चा करून काँग्रेसलाच इंडी आघाडीतून बाहेर काढू, असा इशारा आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी दिला आहे. 

काँग्रेस नेता अजय माकन यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल हे देश विरोधी असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या आणि अतिशी यांच्या विरोधात पोलिसात तक्रारी दिल्या आहेत. त्यावरून संतापलेल्या अतिशी यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसला कडक शब्दात सुनावले आहे. 

काँग्रेस आणि भाजपचे साटेलोटे?

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांचे साटेलोटे झाले आहे काय, असा सवाल अतिशी यांनी केला आहे. असे साटेलोटे नसेल तर काँग्रेसने 24 तासात आम आदमी पक्षावर आरोप करणाऱ्या अजय माकन आणि इतर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करावी. अन्यथा इंडी आघाडीतील इतर पक्षांशी चर्चा करून त्यांना काँग्रेस बरोबर आघाडीत राहणे घातक असल्याचे पटवून देऊ आणि काँग्रेसलाच आघाडीतून बाहेर काढू, असे त्या म्हणाल्या. 

काँग्रेस आमच्याबरोबर आघाडीत आहे. मात्र, त्यांचे नेते आमच्या नेत्यांना देशद्रोही म्हणत आहेत. भाजप आमचा विरोधक असून देखील त्यांच्याकडून असा आरोप कधी झालेला नाही. संसदेत आम आदमी पक्ष कायम काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात काँग्रेस नेते संदीप दीक्षित निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने साऱ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. आमच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्या काँग्रेसला आमचा सवाल आहे की त्यांनी आतापर्यंत कधी भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत का, असेही अतिशी म्हणाल्या.

Post a Comment

0 Comments