Jagdish Kore पत्रकार: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे आपल्याला राजकारण करायचे नाही. मात्र, या प्रकरणाचा सूत्रधार धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. मुंडे यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे तपास करताना यंत्रणांवर दबाव असणार आहे. हा दबाव येऊ नये म्हणून या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
तरदेशमुख यांची हत्या झाल्यानंतर गावाला भेट देणारा मी पहिलाच आमदार होतो. गावातच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे. मात्र, लोकांमध्ये संतापही आहे. रोष आहे. आपण गावाला भेट दिली तेव्हा गावातल्या लोकांनी वाल्मीक कराड याचे नाव घेतले. तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्यामुळे यंत्रणांवर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा. तपास पूर्ण झाल्यावर मुंडे यांना पुन्हा मंत्रीपदावर घेण्यास आपला कोणताही आक्षेप नाही, असेही क्षीरसागर म्हणाले.
बीडमध्ये या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी मोर्चा निघत आहे. हा मोर्चा कुठल्याही राजकीय पक्षाने काढलेला नाही. यात सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी आहेत. देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावी ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.
0 Comments