Hot Posts

6/recent/ticker-posts

*गुरूचरणी समर्पित भाव ठेवल्यास भक्तांमध्ये निर्माण होईल दुःखातून सावरण्याची क्षमता*


 
         अकबर शेख (प्रतिनिधी) सोलापूर : "तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांचे जीवन मानवधर्माच्या उद्धारासाठी अत्यंत प्रेरणादायक असून संसाररुपी समुद्रातून तारून जाताना अनेक संकटे निर्माण होतात, त्या समयी गुरुचरणी समर्पित भाव तसेच अपार श्रद्धा ठेवल्यास आपल्या मनोकामना निश्चितच पूर्ण होऊन मानवी जीवन सुखी समाधानी होईल." असे श्री. बृहन्मठ होटगी संचलित भवानी पेठ येथील *एस. व्ही. सी. एस. प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. राम ढाले सर* यांनी मिरवणुकीस प्रारंभ करताना प्रतिपादन केले.
           प्रारंभी *श्री मल्लिकार्जुन मंदिरात श्री. मन्मथेश्वर हिरेमठ सर* यांच्या संस्कृत श्लोक पठण व विधिवत पूजनाने पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली.
           एस. व्ही. सी. एस. प्रशालेच्या वतीने प. पू. ष. ब्र. लिं. श्री. तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या *सातव्या* गुरुपुण्याराधनानिमित्त आयोजित पालखीतील *प्रतिमेचे व पादुकांचे पूजन काशीपीठाचे जगद्गुरु श्री. श्री. श्री. १००८ ज्ञानसिंहासनाधीश्वर डाॅ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य सान्निध्यात, श्री बृहन्मठ होटगी संस्थेचे सचिव श्री. शांतय्या स्वामी सर व प्रशालेचे प्राचार्य श्री. राम ढाले सर* यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
            या मिरवणुक सोहळ्यास काशीमहापीठ ट्रस्टच्या सदस्यपदी नुकतीच निवड झालेले हृदयम हॉस्पिटलचे डाॅ. शैलेश पाटील, डाॅ. किरण (मालक) देशमुख, मा. नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
            यासमयी श्री सिद्धेश्वर, श्री गणपती, श्री स्वामी समर्थ आदि देवतांच्या गीतांवर आधारित अप्रतिम नृत्यांचा आविष्कार सादर करण्यात आला. सर्वांचे लक्ष वेधून घेणारे *शंकर, विठ्ठल-रुक्मिणीचा* पोषाख परिधान केलेले विद्यार्थी तसेच *ढोल, ताशा, लेझीम,* आदी वाद्यांच्या गजरात मोठया उत्साहात महास्वामीजींच्या *प्रतिमेसह पादुकांची* भव्य मिरवणूक काढण्यात आली.
         पालखी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी *सद्भक्तांनी* पुष्पवृष्टी करून, सुबक रांगोळीच्या पायघड्या घालून मोठ्या भक्तीभावाने पालखी व मिरवणुकीचे भव्य स्वागत केले. तसेच पूज्य महास्वामीजींच्या *पालखीचे दर्शन घेऊन, मोठ्या भक्तीभावाने सुवासिनींच्या हस्ते औक्षण करून, पूजन* करण्यात आले.
          याप्रसंगी महाराष्ट्र शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा एस. के. बिराजदार प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुनाथ वांगीकर सर, जोशी समाज मंडळ, केदार पाटील, डॉ. राजीव मठ, सौ. सुजाता दुमनगुंडी, डॉ. योगिराज बिराजदार, सोमनाथ रगबले, मा. स्थायी समिती सभापती केदार उंबरजे, श्री. देवकर, सचिन अंबारे, बसवराज लंगोटे, परमशेट्टी मालक, सिद्धू मुत्या, योगीनाथ खेमाने, सौ. पूजा उपासे, राजू हिरेमठ, महेश शेळके, इ. मठाच्या सद्भक्तांनी पालखी मिरवणूक शेळगी, मित्र नगर, दहिटणे, सन्मित्र नगर मार्गावरून जात असताना प्रसाद वाटप करत पूज्य महास्वामीजींच्या चरणी सेवा समर्पित केली.
             या पालखी मिरवणुकीस प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे *उपप्राचार्य श्री. रामेश्वर झाडे सर, प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. महादेव वांगीकर सर* यांचे मार्गदर्शन लाभले.    
           याप्रसंगी स्काऊट गाईडचे प्रमुख  *श्रीकांत शेटे* सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश गुरव, अमर कस्तुरे, रमेश प्रचंडे, लक्ष्मीकांत बिराजदार, रेखा मड्डे तसेच प्रशालेतील आर. एस. पी. व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी *स्वच्छता दूत* म्हणून काम केले.
            प्रभातफेरी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments