Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्य महिला आयोगाने घेतली दखल रूपाली चाकणकर

जगदीश कोरे (प्रतिनिधी):-मुंबई राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्राजक्ताच्या तक्रार अर्जाची दखल घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थिती दर्शक केलेला अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

चाकणकर यांनी प्राजक्ताचा तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संपूर्ण प्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. त्यानुसार, प्राजक्ता यांचा तक्रार अर्ज आज मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाला पाठवण्यात आला असून त्याची एक प्रत बीड पोलीस अधिक्षक आणि सायबर क्राइम विभागालाही पाठवण्यात आली आहे.

सायबर क्राइम विभागाच्या माध्यमातून प्राजक्ता यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अश्लिल विधानांची चाचपणी व्हावी आणि त्यावर कारवाई व्हावी, असे निर्देश पत्राद्वारे राज्य महिला आयोगाने सायबर क्राइम विभागाला दिले आहेत.

Post a Comment

0 Comments