Jagdish Kore पत्रकार(प्रतिनिधी)बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामध्ये मागील तीन आठवड्यांपासून सातत्याने चर्चेत असलेले अजित पवारांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड आज सीआयडीच्या कार्यालयात शरण आले आले आहेत. यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती सीआयडीतील सूत्रांनी दिली. वाल्मिक आजच शरण येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आज सकाळपासूनच सीआयडीच्या कार्यालयासमोर गर्दी झाली होती.
देशमुख हत्या प्रकरणांमध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या नऊ टीम कार्यरत आहेत. टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडीचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व टीमने सुमारे शंभरहून अधिक लोकांची या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चौकशी केली आहे. वाल्मिकवर सीआयडीने आपला दबाव वाढवण्यास सुरुवात केली होती.
वाल्मिकने एक व्हिडीओ प्रदर्शित करुन आपण शरण येत असल्याची घोषणा केली.
मी वाल्मिक कराड. केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना, सीआयडी ऑफिस, पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे. संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझे नाव जोडले जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो, तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार आहे, असे वाल्मिक यांनी म्हटले आहे."
0 Comments