Hot Posts

6/recent/ticker-posts

सरपंच संताेष देशमुख हत्याप्रकरणीकाेणत्याही आराेपीला माेकळे साेडले जणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Jagdish Kore पत्रकार: मुंबई: प्रतिनिधी
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी कोणत्याही आरोपीला मोकळे सोडले जाणार नाही. सर्व आरोपींना शोधून काढून फासावर चढवेपर्यंत पोलिस आणि सरकार शांत बसणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

केज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपी व मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप असलेले वाल्मीक कराड यांनी पुणे येथील सीआयडीच्या कार्यालयात शरणागती पत्करली. त्यानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. 

बीडमध्ये अथवा राज्यभरात कोठेही गुंडांचे राज्य चालू दिले जाणार नाही. हत्या करू दिल्या जाणार नाहीत. खंडणी वसुली चालवून घेणार नाही. बीडच्या सर्वच प्रकरणांची कसून चौकशी केली जाईल. ज्याच्या ज्याच्या विरोधात ज्या ज्या गुन्ह्यात पुरावे आढळून येतील त्यानुसार पोलीस त्यांच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई करतील, असेही फडणवीस यांनी सांगितले. 

यातील राजकारणात आपण पडणार नाही 
वाल्मीक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्यामुळे मुंडे यांच्याकडून मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, किमान त्यांना या प्रकरणातील आरोपपत्र दाखल होईपर्यंत कोणतेही खाते दिले जाऊ नये, अशा मागण्या केल्या जात आहेत. त्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, या प्रकरणातील राजकारणात आपण पडणार नाही. ज्यांना कोणाला याचे राजकारण करायचे असेल त्यांनी ते करावे. आम्ही त्यात पडणार नाही. मात्र, या प्रकरणाचा तपास जाणीवपूर्वक राज्य अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला आहे. त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आली आहे. त्यांच्यावर कोणाचाही दबाव खपवून घेतला जाणार नाही. सीआयडीकडून अत्यंत वेगाने तपास सुरू आहे. त्यामुळेच आरोपींना शरण येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. उर्वरित फरार आरोपींनाही पोलीस लवकरच शोधून काढतील, असे त्यांनी सांगितले. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाली असून त्यांना देखील या प्रकरणात कठोरात कठोर कारवाई केली जाईल, याबद्दल खात्री देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments