Hot Posts

6/recent/ticker-posts

मंत्रि मंडळात समावेश न झाल्याने नाराज असलेले आम. छगन भुजबळ या वेळी फडणविस यांनी आठ ते दहा दिवसात याेग्य मार्ग काढू अशी ग्वाही दिली.

Jagdish Kore पत्रकार: मुंबई: प्रतिनिधी 
मला आठ ते दहा दिवसांचा वेळ द्या. सध्याच्या परिस्थितीवर आपण योग्य तो मार्ग काढू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात नाराज असलेले छगन भुजबळ यांना दिली आहे. 

मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने नाराज असलेल्या भुजबळ यांनी समीर भुजबळ यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर या भेटीचा वृत्तांत त्यांनी माध्यमांना कथन केला. यावेळी फडणवीस यांनी सध्याच्या परिस्थितीवर आठ ते दहा दिवसात योग्य मार्ग काढू, अशी ग्वाही दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीत विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशात इतर मागास प्रवर्गातील मतदारांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या हिताचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांचे आभार मानण क्रमप्राप्त आहे. मुख्यमंत्री फडणवीस कोणत्याही परिस्थितीत इतर मागास प्रवर्गाचे नुकसान होऊ देणार नाहीत, असेही भुजबळ म्हणाले. 

सध्याच्या परिस्थितीचा मी साधकबाधक विचार करत आहे. लवकरच आपण या परिस्थितीतून मार्ग काढू. माझा हा निरोप इतर मागास प्रवर्गातील नेत्या कार्यकर्त्यांनाही द्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments