Jagdish Kore पत्रकार: विधानसभा निवडणुकीबाबत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर मतदार यादीतील नावे वगळ्यासोबतच इतर आरोप काँग्रेसने केले होते. दरम्यान, काल निवडणूक आयोगाने काँग्रेसला खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे.
निवडणूक आयोगाने सांगितले की, पक्षाने मागितलेली सर्व माहिती आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील मतदारांशी संबंधित फॉर्म 20 महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, ते डाउनलोड केले जाऊ शकते.
विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीतून मतदारांची नावे वगळण्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला होता. काँग्रेसच्या तक्रारीत म्हटले आहे की, महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान, मतदार यादीतून 80,391 मतदारांची नावे काढून टाकण्यात आली आहेत, म्हणजेच एका विधानसभा मतदारसंघातून सरासरी 2,779 मतदारांची नावे काढून टाकण्यात आली आहेत.
काँग्रेसच्या प्रश्नांवर स्पष्टीकरण देताना निवडणूक आयोगाने सांगितले की, ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत त्यांच्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया करण्यात आली आहे. त्या मतदारांचा मृत्यू झाला आहे किंवा त्यांचा पत्ता बदलला आहे किंवा ते त्या पत्त्यावर राहणार नाहीत याची खात्री करण्यासाठी नोटीस जारी केल्यानंतर आणि फील्ड सर्व्हे केल्यानंतर त्यांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आली आहेत, असे आयोगाने म्हटले आहे.
0 Comments