Hot Posts

6/recent/ticker-posts

शालेय विद्यार्थ्यांना विकृत ज्ञान व विद्यार्थिनीला अवमानजनक प्रश्न विचारल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल व अटक

 नारायण अलदार (प्रतिनिधी) :- पुणे शहरातील चंदननगर परिसरात शिक्षण क्षेत्राला कलंक ठरणारी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चंदननगरमधील एका नामांकित शाळेतील शिक्षक मंगेश बोराटे याने इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रेमसंबंधांबाबत विकृत स्वरूपाचं ज्ञान देत एका विद्यार्थिनीला “तुझं कुठे लफडं आहे का?” असा संतापजनक व लज्जास्पद प्रश्न विचारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थिनी मानसिकरित्या भयभीत झाली असून, तिच्या कुटुंबीयांनी तात्काळ चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तत्काळ  आरोपीवर कारवाई करत शिक्षक मंगेश बोराटे याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 चे कलम 79, तसेच POCSO कायदा, 2012 च्या कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित शिक्षकास अटक करण्यात आली असून, सध्या तो चंदननगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहे. पुढील तपास पुणे  पोलीस करत असून या प्रकाराचा सखोल शोध घेतला जात आहे.

शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात अत्यंत जबाबदारीने वागणं अपेक्षित आहे. अशा घटनांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Post a Comment

0 Comments