Hot Posts

6/recent/ticker-posts

'कोणत्याही स्थितीत कोकाटे यांचा राजीनामा घ्या'संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बजावले


  जगदीश कोरे (प्रतिनिधी)मुंबई: प्रतिनिधी.सर्व स्तरातून आक्रोश व्यक्त होत असताना देखील विधिमंडळात रमी खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेण्यामागे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची कोणती मजबुरी आहे, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. कोणत्याही परिस्थितीत कोकाटे यांना राजीनामा द्यावाच लागेल आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तो घ्यावाच लागेल, असेही त्यांनी बजावले. 

अधिवेशन सुरू असताना कोकाटे हे विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रसिद्ध केला. त्यानंतर कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यांनी देखील आज पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे. 

दीर्घ काळापासून महाराष्ट्राला संवेदनशील आणि अकार्यक्षम कृषी मंत्री मिळाले आहेत. यापूर्वी दादा भुसे कृषिमंत्री होते. त्यांचा देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काहीही उपयोग झाला नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली. 

कृषिमंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे. या पाटीलकीत मन रमत नाही म्हणून कोकाटे सभागृहात रमी खेळत बसले असतील, अशी टीका करतानाच संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त कृषी मंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेऊन फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोलाची भेट द्यावी, असे उपरोधिक आवाहन देखील त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments