Hot Posts

6/recent/ticker-posts

चुलतीला ‘आय लव यु’ म्हटल्यामुळे तरुणाला लाथाबुक्याने हॉकी स्टीकने मारहाण करुन केला खुन



पुणे प्रतिनिधी. (नारायण अलदार): 
चुलतीला  ‘आय लव यु’ म्हणून तिचा विनयभंग केल्याच्या रागातून दोघांनी तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि हॉकी स्टीकने मारहाण करुन त्याचा खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे़.

मयत साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय ३५, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय २१), समर्थ उर्फ करण पप्पू शर्मा (वय २१, दोघे रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस हवालदार राहुल गिरमे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना चंदननगरमधील आंबेडकर वसाहतीत मंगळवारी रात्री साडेआठ ते दहा दरम्यान घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर भागातील डॉ. आंबेडकर वसाहतीत साईनाथ जानराव व आरोपी रहायला आहेत. साईनाथ जानराव याने आरोपींच्या चुलतीची छेड काढली व तिला  ‘आय लव यु’ असे म्हणाला होता. त्याचा वाल्हेकर व शर्मा यांनी जानराव याला जाब विचारला. यावरुन साईनाथ जानराव आणि आरोपींमध्ये वादावादी झाली. तेव्हा दोघांनी जानराव याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हॉकी स्टीकने जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजल सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे व त्यांच्या सहकारी  यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पुढिल अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर करीत आहेत.

Post a Comment

0 Comments