जगदीश कोरे (उप संपादक उपेक्षितांचे व्यासपीठ) बारामती: -महाराष्ट्राला लवकरच मराठा आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या संघर्षाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा देतानाच, या संघर्षाला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील जबाबदार असतील. जरांगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची फूस आहे, असा आरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला.
जरांगे पाटील यांना संविधान कळत नाही. आरक्षण मिळविण्यासाठी दादागिरीचा उपयोग होत नाही. ते संविधानाने मिळते, असे प्रा. हाके यांनी नमूद केले. जरांगे हे मराठा आणि ओबीसी यांच्यात संघर्ष निर्माण करू पहात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
शरद पवार यांनी फुले, शाहू, आंबेडकर यांची नावे घेऊन ओबीसी आरक्षण बुडवले. त्यांनीच जरांगे यांना रसद पुरवली, या आरोपाचा पुनरुच्चार प्रा. हाके यांनी केला. ओबीसी मतदार पवार यांच्यापासून दूर गेल्यामुळे त्यांनी मंडल यात्रेचा घाट घातला आहे. शरद पवार हे दुतोंडी मांडुळासारखे आहेत. त्यांची दुटप्पी भूमिका ओबीसी समाजाला आवडलेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
अजित पवार हे जातीयवादी नेते
अजित पवार हे जातीयवादी नेते आहेत. कारखानदार, ठेकेदार, भांडवलदार यांचे नेते आहेत, असा आरोप प्रा. हाके यांनीं केला. अजित पवार यांचा 'महाज्योती' संदर्भात सामाजिक भेदभाव मी वारंवार महाराष्ट्रासमोर आणला आहे. ते राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शोभत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
वडलांचे कर्तृत्व हेच सुप्रिया सुळे यांचे भांडवल
पवार कुटुंब हे ईस्ट इंडिया कंपनीसारखे आहे. ते कायम सत्तेत असतातम्हानून मी त्यांच्या विरोधात बोलतो. खासदार सुळे यांचे कर्तृत्व काय? कोणत्या कामगिरीमुळे त्यांना आदर्श संसद रत्न पुरस्कार मिळतो? त्यांनी कधी तळागाळातील समाजाचे प्रश्न संसदेत मांडले आहेत का, असे सवाल करतानाच प्रा. हाके यांनी वडलांचे कर्तृत्व हेच सुप्रिया सुळे यांचे राजकीय भांडवल असल्याची टीका केली.
0 Comments