Hot Posts

6/recent/ticker-posts

सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळांकडुन यंदाच्या वर्षी सैनिकांच्या सन्मानार्थ व डी.जे.बंदीच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन


  जगदीश कोरे (उप संपादक उपेक्षितांचे व्यासपीठ) सोलापुर दि,२९.सोलापुर शहरातील स्वातंत्र्यपुर्वकाळातील पहिले मंडळ अशी ख्याती असलेल्या सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळांकडुन यंदाच्या गणेशोत्सवात विविध समाजउपयोगी,प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उत्सव अध्यक्ष सोमनाथ मेंडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय सैन्यांच्या सन्मानार्थ तसेच मानवी जीवनाला घातक असलेल्या जीवघेण्या डीजे डाॅल्बी बंदीच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन बुधवार दिनांक ३/९/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता पोलिस उपायुक्त विजय कबाडे,आमदार विजयकुमार देशमुख,राजशेखर हिरेहब्बु,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे,चंद्रकांत वानकर यांच्या हस्ते रॅलीस हिरवा झेंडा दाखवुन सुरुवात करण्यात येणार आहे.
ही रॅली नवी पेठ,चौपाड,पंजाब तालीम,मल्लिकार्जुन मंदिर,बाळीवेस मध्यवर्ती मिरवणुक मार्गाने जात दत्त चौकातील सरस्वती विद्या मंदिर येथे रॅलीचा समारोप होणार आहे.
या रॅलीत दहा शाळेतील सुमारे एक हजार एनसीसी कॅडेटसह विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती ट्रस्टी गौरव जक्कापुरे यांनी दिली.
सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळाने यंदाच्यावर्षी नागेश करजगी ऑर्किड शाळेत पर्यावरण पूरक गणेश मुर्ती बनविण्याच्या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन मंडळाने नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबवित असुन त्यास भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे उत्सव अध्यक्ष सोमनाथ मेंडके यांनी सांगितले.
यंदाच्यावर्षी विसर्जन मिरवणुक ही सकाळी ११ वाजता देशमुख वाड्यात  मानाच्या गणपतीचे पुजन करुन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात येणार आहे या मिरवणुकीत पारंपारिक वाद्य,लेझीम,झांज,टिपरी,ढोल पथकांचा सहभाग असुन एकुन चाळीस मंडळे आपल्या लेझीम ताफ्यासह सहभागी होऊन शिस्तबद्ध डाव सादर करीत असतात.
 सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळांकडून डीजे डाॅल्बीमुक्त अशा मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव अध्यक्ष सोमनाथ मेंडके यांनी केली आहे.
या पत्रकार परिषदेस ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे,ट्रस्टी सुनिल रसाळे,ट्रस्टी संजय शिंदे,ट्रस्टी विजय पुकाळे,ट्रस्टी गौरव जक्कापुरे,गणेश चिंचोळी,चक्रपाणी गज्जम,मल्लिनाथ याळगी,संतोष खंडेराव,दिलीप पाटील यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments