नारायण अलदार (प्रतिनिधी) पुणे :-
पुण्यातील कळसनगर येथे १५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सुमारास १० ते १०.३० दरम्यान झालेल्या अपघाताने खळबळ उडाली.
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका कारचालकाने नियंत्रण सुटून थेट ट्राफिक उपआयुक्त (डीसीपी) हिम्मत जाधव यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ट्राफिक डीसीपींच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मद्यधुंद आरोपीविरोधात नशेत वाहन चालवणे या प्रकरणी तपास सुरु केला असून गुन्हा (गु.र.नं. व कलम 224/२०२५. बी.एन.एस. कलम २८१, १२५ (ए), ३२४(४) मो.वा.का. कलम १८४, १९९/१५७) प्रमाणे नोंदवला आहे.
पुढिल अधिक तपास पुणे पोलीस करत आहेत.
0 Comments