Hot Posts

6/recent/ticker-posts

रोहित पवारांकडून दंगली घडवण्याचे कारस्थान ?

 जगदीश कोरे (उप संपादक उपेक्षितांचे व्यासपीठ)मुंबई:-राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. गेल्या चार दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. अशातच मराठा क्रांती मोर्चाने मोठा दावा केला आहे. आमदार रोहित पवार दंगली घडवण्याचे कारस्थान करत आहेत. यांचे काही मॅसेज समोर आले आहेत, असा धक्कादायक आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी केला आहे.
शिंदे सरकारच्या काळात मराठा समाजाला काही प्रमाणात मागण्या मान्य झाल्या आहेत. मात्र पुन्हा मराठा समाज हा मुंबई येथे आंदोलनास बसला आहे. त्याच वेळी तो विषय संपला होता. मात्र आता आरक्षणाचा पोपट मेला आहे. रोहित पवार यांचे काही मॅसेज समोर आले आहेत. त्यामुळे या मराठा समाजाच्या आंदोलनामागून काही असूरी शक्ती दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याची जोरदार टीका गिड्डे पाटील यांनी केली आहे.
तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात यावी. त्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांची नेमणूक करून त्या समितीचा अहवाल घ्यावा आणि तो अहवाल जो असेल तो राज्य सरकारने मान्य करावा, असेही गिड्डे पाटील म्हणाले.

Post a Comment

0 Comments