जगदीश कोरे (उप संपादक उपेक्षितांचे व्यासपीठ) मुंबई:-मराठा आंदोलकांनी घातलेल्या घेरावानंतर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, युवा मुलांच्या मनात..
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसले आहेत. मात्र, आंदोलक हे मुंबईमध्ये काही भागात ठिय्या wकरताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे या जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी काल गेल्या असताना त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, इतके मोठे आंदोलन सुरू आहे, एखादी अशी गोष्ट घडने ठिक आहे. तरूण मुले आहेत, त्यांच्या काही भावना असतात. माझी नैतिक जबाबदारी असल्याने मी काल तिथे गेले. युवा मुलांच्या मनात काही भावना असतात. पाटलांची तब्येत खराब झाली होती, मी तिथे केले. थोडक्यात चर्चा झाली. माझी राज्याच्या सरकारला आणि मुंबई महापालिकेला विनंती आहे की, आंदोलनाच्या ठिकाणच्या स्वच्छेतेकडे लक्ष दिले पाहिजे.
0 Comments