Hot Posts

6/recent/ticker-posts

*गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी नाना पेठेत बेधुंद गोळीबार, गोविंदा कोमकरचा खून*


 नारायण अलदार पुणे (प्रतिनिधी) :-पुण्यात गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी पूर्वसंध्येला गँगवॉरची मोठी धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठेमध्ये गोविंदा कोमकर या तरुणाची तीन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

पुण्यात पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त असूनही गुन्हेगारांनी पुर्व वैमन्यातून ऐन सणासुदीच्या काळात आपल्या गुन्हेगारीचे वर्चस्व सिध्द केले आहे. पुण्यात पोलीसांविषयी गुन्हेगारांमध्ये कोणत्याही प्रकारची भीती असल्याचे दिसून येत नाही असे घटनेतून नागरिकांना पाहायला मिळाले आहे. ह्यातून पुण्यात गुन्हेगारीने पोलीसांसाठी मोठे आव्हान निर्माण केले आहे. 

ऐन सणासुदीला गणेश महोत्सवात नागरिकांना अशा गुन्हेगारीमुळे गणेश महोत्सव पाहायला भीती वाटत असल्याचे नागरिकांना वाटत आहे. अशा घटनांमुळे सामाजिक एकात्मता बिघडवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे कार्य अलिकडच्या गुन्हेगारांमध्ये पुणेकरांना पाहायला मिळत आहे. 

हया घटनेमध्ये गोविंदा कोमकर हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी संजीवनी कोमकर हिचा पुतण्या होता. गेल्या वर्षी याच नाना पेठ परिसरात वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी संजीवनी कोमकर सध्या तुरुंगात आहे. तसेच, गोविंदाचे वडील गणेश कोमकर आणि काका जयंत कोमकर हे देखील वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आरोपी म्हणून तुरुंगात आहेत. 

काल हत्या झालेला गोविंदा कोमकर आणि गेल्या वर्षी हत्या झालेले वनराज आंदेकर हे दोघे सख्खे मामा-भाचे होते. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्धाची भीती निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा पुढिल अधिक तपास पुणे पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments