Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षाने पालकमंत्री गोरे व आ. देवेंद्र कोठे यांना बालिश म्हणून हिणवले ?


   जगदीश कोरे (प्रतिनिधी)साेलापूर, :- 8 नोव्हेंबर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केल्यापासून दादांच्या राष्ट्रवादीमध्ये भाजपमुळे काहीशी चिडचिड होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
   त्याचे पडसाद सुद्धा आता उमटताना दिसत आहेत. सोलापूरच्या अजित पवार राष्ट्रवादी गटाचा युवक अध्यक्ष सुहास कदम याने जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांना बालिश म्हणून हिणवले आहे.

नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणजीतसिंह शिंदे व बंधू विक्रम शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हा राष्ट्रवादीला धक्का होता. तसेच महायुतीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून सुद्धा धुसफुस ऐकायला मिळतेया मोठ्या प्रवेशामागे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याणशेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. हीच सल राष्ट्रवादीला असल्याचे पाहायला मिळते.

Post a Comment

0 Comments