Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्याध्यापक ऑनलाईन फरक बिले पाठवत नाहीत म्हणून मास्तरांचे कुटूंबासह दोन दिवसापासून उपोषण शिक्षण अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची केली मागणी


सोलापूर (प्रतिनिधी)- शांतीनाथ महोदव इंगोले श्रीनाथ विद्यालय सोनके येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझी वैयक्ति मान्यता २५ एप्रिल २०२३ रोजी झाली असून शालार्थ आय.डी. ३ मे २०२३ रोजी झाला आहे. माझे जून २०२३ पासून नियमित वेतन शाळेतून निघत आहे.माझे १ जानेवारी २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंतचे फरक बिल रक्कम रुपये १७,२१,६३७/- (अक्षरी सतरा लाख एकवीस हजार सहाशे सदोतीस रु. फक्त) वेतन अधिक्षक (माध्य), यांचेकडे ऑफलाईन पद्धतीने दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी दाखल केले आहे. परंतु ऑनलाईन पद्धतीने बील पाठविले नाही. तसेच २८ मार्च २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतचे एकूण फरक रक्कम २,८३,९१९/-(अक्षरी दोन लाख त्रेचाळीस हजार नऊशे एकोणीस रु. फक्त) ऑफलाईन पद्धतीने मुख्याध्यापकांनी माझ्याकडे दिले आहे. परंतु वेतन अधिक्षक यांनी ते ऑफलाईन इनवर्ड केलेले नाही. तसेच ऑनलाईन देखील पाठविले नाही.
तरी सध्या ऑनलाईन बील पाठविणे सुरु असून गेल्या दोन वर्षापासून माझे ऑनलाईन बील पाठविण्यास मुख्याध्यापक टाळाटाळ करीत आहेत. सदर बील मुदतीत न पाठविल्यास मला माझी बिलाची रक्कम मिळतं नसल्याने सह शिक्षक शांतीनाथ इंगोले दिनांक २२ डिसेंबर २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून सह कुटुंब उपोषण करत आहेत

Post a Comment

0 Comments