बंधूंकडून मुंबईसाठी जाहीरनामा
जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये, आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी घोषणांच्या उंचच उंच इमारती उभारल्या आहेत.
शिवसेना-मनसेचा जाहीरनामा जाहीर करण्यासाठी अमित ठाकरे आज दादरमधील शिवसेना भवनमध्ये आले, येथे दोन्ही बंधूंनी युतीचा जाहीरनामा जाहीर करताना मोठ्या घोषणा केल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये स्वाभिमान निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईकरांचा स्वाभिमान म्हणत घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये स्वाभिमान निधी देणार आहोत. आम्ही महायुतीप्रमाणे निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजना सुरु करत नाहीय. आपली सत्ता आल्यावर आपण हे करू याची ग्वाही देत आहोत. कोळी महिलांसाठी माँ साहेब किचनमधून 10 रुपयात जेवण दिले जाणार आहे, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.
महापालिकेच्या शाळामध्ये ज्युनिअर कॉलेज सुरु करणार
10 वी नंतर ज्युनिअर कॉलेज BMC च्या माध्यमातून सुरु करणार आहोत. सर्व बोर्डाच्या शाळा सुरू करणार, त्यात मराठी भाषा अनिवार्य असेल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
जिथे जिथे महापालिकेचे वाहनतळ आहे ते मोफत
असले पाहिजे. सध्या भाडे आकराणी केली जात आहे.
प्रत्येक फ्लॅटला एक पार्किंग असायला हवी.
स्वयंरोजगार -हा महत्वाचा विषय आहे. मुंबईत प्रत्येकला नौकरी हवी आहे. त्यासाठी एक लाख तरुण तरुणीना 25 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत स्वयंरोजगार सहायता निधी देऊ
आत्तापर्यत महापालिकेने 500 स्केअर फूटपर्यत मालमत्ता कर माफ केला होता. मुंबईत पुन्हा आपली सत्ता आल्यास 700 स्केअर फूटपर्यतच्या घरांना मालमत्ता कर माफ करू.
पादचारी रस्ता - फुटपाथ आणि मोकळ्या जागा हव्यात.
नागरिकांना फुटपाथ हा मिळालाचं पाहिजे.
हे काम आम्ही हट्टाने करून घेणार
मुंबईकरांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे यासाठी
मुंबईत क्लायमेट ऍक्शन प्लॅन रबावायचा आहे. पर्यावरण चा विचार हा करावाच लागणार.
आर्थिक राजधानी मुंबईची काळजी कोण घेणार? BPT मध्ये 1800 एकर जागा मुंबईची आहे. त्यावर केंद्र सरकार आपला अधिकार गाजवत आहे, ती जागा आपल्याला घ्यावी लागेल. गिफ्ट सिटीसारखं तिथे काम करावं लागणार आहे. जमीन मिळण्यासाठी कोर्टाची लढाही लढू, पण ही जागा आपण घेऊ.
नागरिकांना100 युनिटपर्यत वीज मोफत करू,
पूर्व आणि पश्चिम उपनगरात बेस्टकडून कशी वीज मिळेल याचा प्रयत्न करू पाण्याचे दर सुद्धा स्थिर ठेवण्याचा काम करू. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वार्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करू, अशा घोषणा आदित्य ठाकरे यांनी केल्या.
तुम्ही नगरसेवक झाला म्हणजे मी नगरसेवक झालो, आदित्य तर आमदार आहेच. नाशिकमध्ये तपोवनात त्यांचा मंत्री म्हणतो झाड कापवेच लागणार, एवढा माज आहे. आपल्याला हा माज काढायचा आहे, घमंड तोडायचा आहे. आपण, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाळणाघर सुरु करणार आहोत. सगळ्या लहान मुलांची काळजी यामध्ये घेतली जाईल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शौचालय आपण सुरु करणार आहोत. याशिवाय, मुंबईत आणखी एक कॅन्सर रुग्णालय सुरु करायचं आहे. अरली डिटेक्शन ज्याने होईल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे रुग्णलाय सुरु करायचं आहे, असे अमित ठाकरे म्हणाले.
जाहीरनाम्यातील ठळक घोषणा
700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ
घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये,
कोळी महिलांना माँ साहेब किचनमधून 10 रुपयात जेवण
तरुणांना रोजगार सहाय्यता निधी
बेस्ट बसचे तिकीट कमी करून ५-१० १५-२० रुपये फ्लॅट रेट करणार
प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाळणाघर
पालिकेच्या शाळामध्ये ज्युनिअर कॉलेज सुरु करणार
0 Comments