जगदीश कोरे (प्रतिनिधी)पुणे:- भारतीय जनता पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच्या पक्षात डोकावून पहावे आणि आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षावर आरोप करतो आहोत याचे भान ठेवावे, आम्ही त्यांच्यावर आरोप करायला लागलो तर ते त्यांना अवघड जाईल, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला.
पिंपरी चिंचवड महापालिकेत मागील सात वर्षापासून भाजपने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप अजित पवार यांनी नुकताच केला आहे. या आरोपाला चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले.
यावेळची महापालिकेची निवडणूक ही पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार यांनी सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम केले आहे. केंद्र सरकारने पायाभूत सुविधांसाठी च निधी दहा पटीने वाढवला आहे. राज्यातील फडणवीस सरकारने विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत आणि नवे प्रकल्प हाती घेतले आहेत. हे काम पाहून पुण पुणेकरांचा महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
केंद्रात आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असूनही मेट्रो सारखे प्रकल्प त्यांना मार्गी लावता आले नाहीत. उलट या सरकारच्या काळात अनेक प्रकल्प बंद पडले. अशा प्रकल्पांना गती देऊन ते पूर्णत्वाला नेणे आणि नागरिकांच्या हिताचे नवीन प्रकल्प हाती घेऊन ते पूर्णत्वाला नेणे यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
0 Comments