Hot Posts

6/recent/ticker-posts

शिंदे गट आणि अजित पवार गटाची युतीची घोषणा भाजपने चर्चा थांबवल्याचा शिंदे गटाचा आरोप

जगदीश कोरे (प्रतिनिधी) :-सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्या युतीच्या शक्यता संपुष्टात आल्या असून महायुतीतील इतर दोन मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी भाजपला दूर करून युती केली आहे.

आम्ही भाजपकडे 40 जागा मागितल्या होत्या. त्यांनी आम्हाला 8 जागा देऊ केल्या. आमची 26 जागांवर तडजोड करण्याची तयारी होती. या आकड्यावर मात्र आम्ही ठाम होतो. अशा वेळी भाजपकडून चर्चा थांबवण्यात आली. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी युती केली असून दोन्ही पक्ष प्रत्येकी 51 जागा लढवणार असल्याची माहिती शिंदे गटाचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडून देण्यात आली. 

युतीबाबत भाजपाबरोबर बोलणी ठप्प झाल्याने शिंदे गटात अस्वस्थता असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संपर्कमंत्री दत्ता भरणे यांनी काल सोलापूर दौरा केला आणि या दोन पक्षांच्या युतीबाबत घडामोडींनी वेग धरला. अजित पवार गटाने यापूर्वी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता.

Post a Comment

0 Comments