Hot Posts

6/recent/ticker-posts

BMC Election 2026: राज-उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करताच भाजपने मुंबईत शिवसेनेच्या जागा वाढवल्या, तरीही एकनाथ शिंदे अडले, नेमकं काय घडलं?

 Jagdish Kore (पत्रकार): आगामीमुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शिवसेना-मनसे युतीची (Shivsena MNS yuti) घोषणा केली. शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने मुंबईतील मराठी व्होटबँक त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील , असा अंदाज वर्तविला जात आहे.
हा धोका ओळखून आता भाजपने (BJP) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेसाठी 227 पैकीफक्त 52 वॉर्ड सोडण्याची तयारी दाखवली होती. मात्र, आता राज-उद्धव यांच्या युतीनंतर भाजपने शिंदे गटाला जास्त जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. भाजपने शिंदे गटाला 52 वरुन 70 जागांवर लढण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, भाजपच्या या प्रस्तावावरही शिवसेना नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. (RajThackerayandUddhavThackerayalliance )

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने शिवसेनेला 70 जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. भाजपकडून पहिल्या चर्चेत शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. तेव्हा शिवसेनेचे नेते प्रचंड नाराज झाले होते. मात्र, यानंतर शिवसेना-भाजपच्याजागावाटपाच्याबैठकांमध्ये चर्चा होऊन भाजपने आता 70 जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. परंतु, शिवसेनेकडून 100 जागांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, भाजपने त्याला नकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे अद्याप शिवसेना-भाजपमध्ये 25 ते 30 जागांचा तिढा कायम आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरुनरस्सीखेचसुरु असून आज पुन्हा भाजप शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडणार आहे. या बैठकीत हा तिढा सुटणार का, हे बघावे लागेल.

Devendra Fadnavis: देवेंद्रफडणवीसयांचीभाजपनेत्यांबरोबरबैठक

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांची बुधवारी रात्री भाजप नेत्यांबरोबर महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत मुंबई पालिकेसाठी खलबतं सुरु होती. यावेळी मुंबईतील उमेदवारांच्या निवडाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याची माहिती आहे. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस आणि भाजपच्याकोअर कमिटीची बैठक होणार आहे. काल मुंबई भाजपच्याकोअर कमिटीकडून अंतिम यादी स्वरुपात वरिष्ठांकडे काही उमेदवारांची नावं पाठवण्यात आली होती. या नावांवर आज देवेंद्रफडणवीस यांच्याकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

BMC Election news: एकनाथ शिंदेंनी मनसेचा मोहरा गळाला लावला

ठाकरे बंधूंचे युतीच्या दिवशी मनसेचे माजी सिनेट सदस्य पक्षाचे सचिव राज ठाकरेंचे समर्थक सुधाकर तांबोळी यांचा मनसेला जय महाराष्ट्र करत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशकेला आहे. सुधाकर तांबोळी हे राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यापासून मागील 19 वर्ष सुधाकर तांबोळी हे मनसे पक्षात कार्यरत होते. दोन वेळा ते मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून काम करण्याची संधी पक्षात मिळत नसल्याने बुधवारी सुधाकर तांबोळी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला.

Post a Comment

0 Comments