Hot Posts

6/recent/ticker-posts

एसीबीचा मोठा दणका! सांगोल्यात लेडी ऑफिसरच्या सांगण्यावरून ड्रायव्हरने घेतली 7 हजारांची लाच;

        जगदीश कोरे (प्रतिनिधी).सांगोला (सोलापूर): सांगोला तालुक्यातील संगेवाडी मंडल अधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधकविभागाने गुरुवारी (ता. ५) सापळा रचून मंडलाधिकाऱ्याच्या खासगी चालकाला ७ हजारांची (Sangola Bribery Case ACB Trap) लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी मंडलाधिकारी विजया नाईक (रा. इसबावी, ता. पंढरपूर) व त्यांचा खासगी चालक वैभव मोरे (रा. मुंढेवाडी, ता. पंढरपूर) यांच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा (acb trap sangola revenue officer driver) दाखल झाला.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र लांभाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.. तक्रारदार विनोद सीताराम सातपुते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या आईच्या नावावर खरेदी केलेल्या तजमिनीच्या खरेदी दस्तावर आलेल्या हरकतीचा निकाल त्यांच्या बाजूने लावून सातबारा उताऱ्यावर नाव नोंद -रण्यासाठी मंडलाधिकारी नाईक यांच्या वतीने १० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.
,,       तडजोडीनंतर ही रक्कम ७ हजारांवर निश्चित करण्यात आली. तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष केली. त्यावेळी मंडलाधिकारी नाईक यांनी चालक वैभव मोरे याच्यामार्फत लाच मागणीस दुजोरा दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुरुवारी संगेवाडी मंडल अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान चालक वैभव मोरे याने तक्रारदाराकडून ७ हजारांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

Post a Comment

0 Comments