जगदीश कोरे (प्रतिनिधी)सोलापूर:- देशात कुशल वैमानिकांची निर्मिती वाढवून भारताला विमान वाहतूक क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेला अनुसरून एएआयने देशातील काही प्रमुख विमानतळांवर फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ) स्थापन करण्यासाठी कंपन्यांकडून ई-टेंडरद्वारे प्रस्ताव मागवले आहेत.
यात समाविष्ट असणाऱ्या सात विमानतळात सोलापूर विमानतळाचा समावेश आहे. यामध्ये केशोद, कडप्पा, हुबळी, तुतिकोरिन, किशनगढ आणि धोलेरा या सात विमानतळांची निवड करण्यात आली आहे.
या विमानतळांवर फ्लाइंग ट्रेनिंग संस्थांची स्थापना झाल्यास देशात प्रशिक्षित पायलटांची संख्या वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
सोलापूर विमानतळाचा या यादीत झालेली निवड ही शहरासाठी अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक संधी मानली जात असल्याचे मत सोलापूर विकास मंचच्या वतीने व्यक्त करण्यात आले.
फ्लाइंग ट्रेनिंग संस्था सुरू झाल्यानंतर सोलापूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांना पायलट होण्यासाठी मोठ्या शहरात किंवा परदेशात जाण्याची गरज भासणार नाही.
स्थानिक स्तरावरच आधुनिक प्रशिक्षण उपलब्ध होणार असल्यामुळे अनेक तरुणांचे पायलट बनण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकते.
इच्छुक कंपन्यांना https://etenders.gov.in/eprocure/app या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे.
या निर्णयामुळे सोलापूर विमानतळाच्या विकासाला नवे परिमाण मिळणार असून, सोलापूरच्या विद्यार्थ्यांचे 'पायलट होण्याचे स्वप्न' लवकरच वास्तवात उतरू शकते, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
ह्या करिता सोलापूर विकास मंचने विमानसेवा सुरू झाल्यापासून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.
0 Comments