Hot Posts

6/recent/ticker-posts

*मंगळवेढा एस टी बस NCMC स्मार्ट कार्ड सुविधांचे नियोजन करण्यासाठी सूर्यकांत काशीद यांची निवड*




नारायण. अलदार (प्रतिनिधी) मंगळवेढा :- सध्याच्या धावपळीच्या युगात डिजिटल सेवेला नागरिकांकडून सर्वात अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे अलीकडच्या काळात पाहायला मिळत आहे.
ह्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांना गतीशील सेवा देण्याच्या माध्यमातून खूप मोलाचे पाऊल उचलले जात असल्याचे काम दिसून येत आहे. 

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक ह्यानी प्रवाशांच्या सोयीसाठी व महामंडळाच्या विकासासाठी डिजिटल सेवेच्या माध्यमातून खूप महत्वाचे प्रगतीशील निर्णय घेतलेले आहेत. 
या त्यांच्या निर्णयाला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डच्या' नोंदणीने आठवड्यात 1 लाखाचा टप्पा पार केला आहे. जो पर्यंत 80% च्या वर डिजिटल नोंदणी होणार नाही, तोपर्यंत जुनी सवलत चालू राहील असे मंगळवेढा एसटी महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले. 

मंगळवेढा एस टी बस आगाराचे मॅनेजर संजय भोसले साहेब यांच्या हस्ते मंगळवेढा बस डेपो या ठिकाणी ही सुविधा चालू करण्यात आली आहे. तरी  श्री सूर्यकांत काशीद 9028670665 यांच्याकडे या सुविधाचे सर्व नियोजन देण्यात आले असून त्यांच्याशी प्रवाशांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेऊन एसटी महामंडळाच्या कामाला गतीशील बनवण्यासाठी अनेकांनी पुढाकार घ्यावा असे सांगण्यात आले आहे. या कामी मंगळवेढा एस टी बस आगाराकडून श्री सूर्यकांत काशीद ह्यांची प्रामुख्याने निवड करण्यात आली असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते व नामवंत मंडळींकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. याविषयी त्यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments