जगदीश कोरे (प्रतिनिधी) सोलापूर:-सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सध्या जोरदार राजकीय हालचालींना वेग आला आहे. दुसरीकडे भाजपातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख या तीन प्रमुख नेत्यांच्या समर्थकांमध्ये संख्याबळाची चुरस रंगली आहे.
कोणाकडे जास्त नगरसेवक, त्याच गटाचा महापौर हे पारंपरिक राजकीय गणित सध्या सोलापुरात लागू होताना दिसत आहे.
दरम्यान, भाजपच्या सर्व नगरसेवकांच्या गॅटवर सह्या घेण्यात आल्या असून आधार कार्ड, पॅनकार्ड, फोटो जमा करून घेतले आहे. 28 जानेवारीला सर्व नगरसेवकांचे वऱ्हाड पुण्याला रवाना होणार आहे. तोपर्यंत सर्व नगरसेवकांनी सोलापूर न सोडण्याचे आदेश भाजप शहराध्यक्षांनी काढले आहेत.
आमदार देवेंद्र कोठे गटाकडे एकूण 41 नगरसेवकांचे पाठबळ असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे माजी आमदार सुभाष देशमुख यांचे 18, तर आमदार विजयकुमार देशमुख यांचे 28 नगरसेवक समर्थक आहेत. त्यामुळे दोन्ही देशमुख गट एकत्र आल्यास त्यांची एकत्रित संख्या तब्बल 46 होते. या संख्याबळामुळे महापौरपद देशमुख गटाकडे जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
0 Comments