जगदीश कोरे प्रतिनिधी ) मुंबई:- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या शंका व अडचणी आता एका फोन कॉलवर दूर होणार आहेत. या लाडक्या बहिणीसाठी 181 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून त्यावर संपर्क साधल्यास या योजनेतील सर्व तक्रारींचे निवारण करण्यात येईल, अशी माहिती तटकरे यांनी दिली
लाडक्या बहिणींना इ केवायसी करताना येणाऱ्या अडचणी अथवा या प्रक्रियेत नजरचुकीमुळे राहिलेल्या तुती दूर करण्यासाठी, तांत्रिक अडचणीमुळे लाभ स्थगित झाल्याबाबत तक्रारी देण्यासाठी अथवा या योजनेबाबत कोणत्याही शंकांचे निवारण करून घेण्यासाठी या दूरध्वनी क्रमांकाचा वापर महिलांना करता येईल.
हात दूरध्वनी क्रमांक घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेसंबंधी सर्व तांत्रिक व अंमलबजावणी बाबतीत सर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या बहुतेक महिलांच्या अडचणी व शंकांचे निवारण त्या एका कॉल वर केले जाईल, असे तटकरे यांनी सांगितले
0 Comments