Hot Posts

6/recent/ticker-posts

महायुतीतील पक्षांनी आचारसंहिता पाळावी: जयकुमार गोरे


जगदीश कोरे (प्रतिनिधी) :-सोलापूर 

आपल्याच मित्र पक्षाला पराभूत करण्याच्या उद्देशाने अनैसर्गिक रित्या कोणाशीही युती आणि आघाडी करण्यापूर्वी महायुतीतील घटक पक्षांनी किमान आचारसंहिता पाळावी, अशी अपेक्षा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली आहे. 

बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे चार पक्ष एकत्र आले आहेत. हे चारही पक्ष एकत्र येऊन त्यांची आघाडी भारतीय जनता पक्षा विरोधात निवडणूक लढणार आहे. या आघाडी बाबत गोरे यांनी नाराजी व्यक्त केली. 

भाजप हा राज्यातील आणि देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. दोन किंवा तीन पक्ष एकत्र येऊन भाजपचा पराभव करू शकत नाहीत हे आता विरोधकांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात चार पाच पक्षांची आघाडी होत आहे. मात्र, अशा अनैसर्गिक युती आणि आघाड्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळणार नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत देखील मतदार भाजपच्या पाठीशी राहतील, असा विश्वास जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments